सहावे इंद्रिय म्हणजे काय? | विज्ञान आणि अध्यात्म काय सांगतात?

तर मंडळी, आपल्यापैकी अनेकांनी असा अनुभव घेतला असेल की आपल्याला अचानक कोणाची तरी आठवण येते किंवा आपण एखाद्या व्यक्तीविषयी चर्चा करत असतो आणि लगेच आपल्याला त्या व्यक्तीचाच फोन येतो. 

एव्हढेच नाही तर एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत नाही, अस्वस्थ वाटते आणि नंतर कळते की तिथे काहीतरी अघटित घडले. असे अनुभव अनेकांना येतात त्यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, हे सहावे इंद्रिय तर नाही?

खरे तर, सहावे इंद्रिय हा विषय अनेक वर्षांपासून विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्यात नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. काही लोक याला अंतर्ज्ञान म्हणतात, तर काहीजण याला अवचेतन मनाची क्षमता मानतात. काही आध्यात्मिक परंपरांमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते.

या लेखामध्ये आपण हा विषय संतुलित आणि माहितीपूर्ण दृष्टिकोनातून बघू या.

सहावे इंद्रिय म्हणजे काय?

सामान्यतः आपण पाच ज्ञानेंद्रियांद्वारे जगाचा अनुभव घेतो ते म्हणजे दृष्टी, श्रवण, वास, चव आणि स्पर्श. याशिवाय अशा काही गोष्टी किंवा घटना आपल्याला जाणवतात परंतु त्याला स्पष्ट असा पुरावा नसतो. एखाद्या परिस्थितीबद्दल आपणास तीव्र अंतर्गत जाणीव होणे, याला अनेक लोक सहावे इंद्रिय (sixth Sense )किंवा अंतर्ज्ञान (Intuition) असे म्हणतात.

याचा अर्थ म्हणजे आपल्याला भविष्य समजते किंवा तशी शक्ती लाभली आहे असा होत नाही. आपली शरीररचना, निरीक्षण, अनुभव तसेच अंतर्मनामध्ये साठवलेली माहिती, विचार या जलद प्रक्रियेचा परिणाम असू शकतो. त्यामुळे अनेक जण सांगत असतात मला काही घडणार असेल तर अगोदर कळते.

विज्ञान काय सांगते?

आता आपण विज्ञानाचा विचार केला तर आधुनिक विज्ञान सहाव्या इंद्रियाला स्वतंत्र इंद्रिय म्हणून मान्यता देत नाही. मात्र, मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या दृष्टीने बघितले तर काही गोष्टी लक्षात येतात.

1. अवचेतन मनाची भूमिका 

आपला मेंदू सतत आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतातमाहिती गोळा करत असतो. त्यातील बरीच माहिती आपल्यालाजाणीवपूर्वक लक्षातही येत नाही.
म्हणजे लहानपणी घडलेल्याघटना किंवा अशा अनेक घटना आपल्या लक्षात येत नाही त्यामेंदू साठवून ठेवत असतो. आणि मग जेव्हा अचानक एखादी घटना घडणार असेल तर आपल्याला सूचना मिळते, जाणीव होते. ही काहीतरी विशेष शक्ती आहे असे वाटते. हीच माहिती अचानक "अंतर्ज्ञान" म्हणून समोर येऊ शकते.

2. अनुभवावर आधारित निर्णय

एखाद्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती अनेकदा क्षणार्धात योग्य असे निर्णय घेतात. खरे तर ही जादू नसून त्यांचा दीर्घ अनुभव, निरीक्षण यामुळे त्यांचा मेंदू तत्काळ माहितीच्या आधारे किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मेंदू नेहमी घडणाऱ्या गोष्टी किंवा त्याला त्या पॅटर्न ची ओळख असते. त्यामुळे अनुभवी मंडळी तत्काळ निर्णय घेतात. असे अनुभव सतत येत असतात. 

3. मानसशास्त्रीय घटक

मानसशास्त्रीय घटकांचा विचार केला तर माणूस भावनिक असतो, त्याच्या अंतर्मनात अनेक गोष्टी साठलेल्या असतात. सुख दुखःच्या आठवणी असतात. अनुभव निरीक्षण दांडगे असेल तर समोरच्या व्यक्तीबद्दल सहज प्रेडिक्शन करता येते. किंवा बघितलं तरी अंदाज येतो. अनेकांना हा अनुभव सहाव्या इंद्रियासारखा वाटू शकतो. 

अध्यात्म काय सांगते?

अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये सहावे इंद्रिय म्हणजे अंतर्मनाची जागरूकता, ध्यानातून विकसित होणारी संवेदनशीलता किंवा आत्मपरीक्षणातून निर्माण होणारी अंतर्दृष्टी असे मानले जाते. 

तर काही परंपरांमध्ये याचा संबंध आज्ञा चक्राशी जोडला जातो. मात्र, या श्रद्धा आहेत आणि त्यांना सर्वमान्य वैज्ञानिक मान्यता आहे असे म्हणता येत नाही. विज्ञानात त्याला ठोस पुरावे नसले तरी आध्यात्मिक बाबतीत अनेक गोष्टी अचंबित करणाऱ्या वाटतात 

काही लोकांच्या अनुभवांनुसार, सहाव्या इंद्रियाबद्दलची लक्षणं..


-एखादी घटना घडण्यापूर्वी अंदाज येणे किंवा अस्पष्ट जाणीव होणे.

-व्यक्तींच्या वर्तनातील छोटासा बदलही पटकन लक्षात येणे.

-महत्त्वाचा निर्णय घेतांना तीव्र अंतर्गत भावना निर्माण होणे.

-अनेक अनुभवांनंतर स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास वाढणे.

परंतु अशी ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखी असतीलच असे नाही.

सहावे इंद्रिय विकसित करता येते का?

हा फार महत्वाचा प्रश्न असून अनेक लोक विचारत असतात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितले तर तसे ठोस पुरावे किंवा निष्कर्ष उपलब्ध नसले तरी सहावे इंद्रिय विकसित केले जाऊ शकते. निरीक्षण, अनुभव, सवयी यामुळे निर्णयक्षमता किंवा आत्मजाणीव वाढण्यास मदत होऊ शकते. 

-नियमित ध्यान योगा किंवा Mindfulness.

-शांतपणे निरीक्षण करण्याची सवय.

-अनुभवांची नोंद ठेवणे.

-पुराव्यावर आधारित विचार करण्याची सवय.

-भावनांपेक्षा तथ्यांनाही महत्त्व देणे.

गैरसमज टाळा

सहावे इंद्रिय म्हणजे अलौकिक शक्ती आहे, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक अनुभव केवळ योगायोग आहे, असेही ठामपणे सांगता येत नाही. परंतु सहाव्या इंद्रिय शक्तीचा आपल्या जीवनात चांगला उपयोग करुन घेता ये शकतो. 

अनेक अनुभवांना वैज्ञानिक स्पष्टीकरण असू शकते, तर काही बाबींचा अभ्यास अजूनही सुरू आहे. त्यामुळे संतुलित दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष

सहावे इंद्रिय हा असा विषय आहे ज्यामध्ये विज्ञान, मानसशास्त्र, अनुभव आणि अध्यात्म या सर्वांचा काही ना काही संदर्भ दिसून येतो. उपलब्ध वैज्ञानिक पुरावे आणि वैयक्तिक अनुभव यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही दाव्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे आणि विश्वसनीय माहितीच्या आधारे मत तयार करणे हीच सर्वोत्तम भूमिका ठरते. सहावे इंद्रिय विकसित असेल तर त्याचा जीवनात चांगला उपयोग करून घेता येतो.

तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का, ज्यामध्ये एखादी घटना आधीच जाणवल्यासारखी वाटली? तुमचे मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी Sixth Sense Marathi ब्लॉगला नियमित भेट द्या आणि हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

संबंधित लेख (Related Articles) 

सहावे इंद्रिय जागृत करण्याचे 7 प्रभावी मार्ग

डेजा व्हू म्हणजे काय? ही लक्षणे तपासा

सहावे इंद्रिय म्हणजे नेमके काय? विज्ञान, अनुभव की मनाची अद्भूत शक्ती?https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/blog-post.html

तुम्हाला Sixth Sense आहे का? ही १० लक्षणे तपासाhttps://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/sixth-sense-10.html

अधिक माहिती हवी आहे?

📺 Sixth Sense Power या YouTube चॅनलला भेट द्या

https://youtube.com/@sixthsensepower

लेखक: Prof. Dr. Sanjay Jadhav

Founder – Sixth Sense Marathi

संशोधन, मानसशास्त्र, स्वप्नशास्र, अंतर्ज्ञान आणि सहावे इंद्रिय या विषयांवर माहितीपूर्ण लेखन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रात्री 3 वाजता जाग का येते?

झोपेत अचानक पडल्यासारखे का वाटते? | Hypnic Jerk म्हणजे काय?

साप स्वप्नात दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र, मानसशास्त्र आणि विज्ञान काय सांगते?